• English
  • मराठी

पनवेल शहरात तिरंगा सायकल रॅली चे आयोजन

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृतमहोस्तवी वर्षानिमित्त युवा मोर्च्या च्या वतीने पनवेल शहरात तिरंगा सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत लहान-थोर सारेच उत्साहात सहभागी झाले होते. याप्रसंगी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते.