• English
  • मराठी

सर्व पक्षीय कृती समितीची पत्रकार परिषद

” 9 ऑगस्ट दिवशी होणारा हा मशाल मोर्चा हा 10 व 24 जून रोजी झालेल्या नामकरण आंदोलनाच्या कार्यक्रमाचा पुढील टप्पा आहे. या मशाल मोर्चासाठी ज्या मशाली प्रज्वलित केल्या जातील त्यांची सुरुवात लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून म्हणजे उरण तालुक्यातील जासई येथून, महापुरुष, हुतात्म्यांना, तसेच लोकनेते दि. बा. पाटील यांना वंदन करून करण्यात येईल. त्यासाठी 9 ऑगस्ट रोजी तेथे एक मोठी क्रांती ज्योत प्रज्वलित केली जाईल.
लोकनेते दि. बा. पाटील यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकर्‍यांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.
या संदर्भात सर्व पक्षीय कृती समितीची पत्रकार परिषद पार पडली.