• English
  • मराठी

विकासकामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन तसेच इतर अनेक सामाजिक कार्यक्रम

माझ्या वाढदिवसानिमित्त मी केलेल्या सेवा ही संघटन या आवाहनानुसार विविध विकासकामे, मदतकार्य आयोजित करण्यात आले.
आज विविध विकासकामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन तसेच इतर अनेक सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले .
त्यामध्ये विचुंबे येथील शिवम कॉम्प्लेक्स ते ग्रीन व्हॅली पर्यत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन, केवाळे गावात अंतर्गत गटारे बांधणे कामाचे भुमिपूजन, दुदरे ते शिवणसई रस्त्याचे उदघाट्न, रिटघर येथे नारायण उसाटकर घर ते दत्तमंदिर पर्यंत अंतर्गत रस्ता व गटार करणे या कामाचे भूमिपूजन झाले. तसेच हरिग्राम ठाकूरवाडी येथे गरजूंना तालुका युवा मोर्चाच्या वतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.