• English
  • मराठी

महाडमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी

महापूर आणि दरड या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी भाजपच्या वतीने महाडकरांसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. दररोज सहा हजार नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आली असून बिस्किटे व पिण्याच्या पाण्याची, तसेच इतर आवश्यक व्यवस्थाही आहे.
या सर्वांमुळे महाडकरांना मोठा दिलासा मिळत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महाडमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी रायगडचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.