काळुंद्रे गाव
काळुंद्रे गावाच्या एका बाजूला रेल्वे, दुसर्या बाजूला द्रुतगती महामार्गाची व राष्ट्रीय महामार्गाची सीमा तर दुसर्या बाजूला नदी असल्याने या गावाला वाढण्यासाठी जागाच नसल्याने स्थानिकांनी नैसर्गिक गरजेपोटी घरे बांधली आहेत. ही घरे बेकायदेशीर ठरवणे या लोकांवर अन्याय आहे. असा प्रकार अनेक गावांबाबत घडल्याने याबाबत शुक्रवारी सिडकोसोबत विस्तृत चर्चा झाली होऊन स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊनच घरे पात्र-अपात्र ठरवल्यावर कारवाई करायची असे ठरले होते. असे असताना आज कारवाई करणे चुकीचे आहे.
त्यामुळे या कारवाईला विरोध करून सदर पोलीस बंदोबस्तासह आलेल्या रेल्वे पथकास परतावून लावले.