पनवेल मंडल शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक
भारतीय जनता पक्षाच्या पनवेल मंडल शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह, मार्केट यार्ड येथे कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून झाली. या सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रकांत दादा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे ऑनलाईन प्रक्षेपण फेसबुक आणि युट्यूब च्या माध्यमातून दाखविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्रात घोटाळे आणि अत्याचार करण्याचे काम महाविकास आघाडी राज्य सरकारच्या माध्यमातून होताना दिसत असून, ठाकरे सरकार हे राज्याचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम करीत आहे, अशी घणाघाती टीका करून ’अब तो ये स्पष्ट है.., ठाकरे सरकार भ्रष्ट है’ असा नारा देत महाराष्ट्राला वाचविण्यासाठी रणशिंग फुंकावे लागेल, अशी घोषणाही श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी केली.