• English
  • मराठी

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत.यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, माजी आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, जर स्वतः त्यांनी राजीनामा दिला नाही तर गृहमंत्री पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी यासाठी भाजपा तर्फे कळंबोली, कामोठे, खारघर, क़र्ज़त, खोपोली, खालापुर आणि
पनवेल येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.