• English
  • मराठी

नागरिकांच्या पाणीप्रश्नाबाबत सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी यांच्या सोबत बैठक

खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल परिसरातील नागरिकांच्या पाणीप्रश्नाबाबत सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी या परिसरातील पाणी समस्येवर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरात लवकर या प्रश्नावर उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केली . या बैठकीस महापौर डॉ कविता चौतमोल,पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर व प्रभाग 15, 16, 17, 18, 20 मधील सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.