• English
  • मराठी

क्रिकेट क्लबतर्फे क्रिकेट कोचिंग अकॅडमी

पनवेल शहरातील मिडलक्लास हाउसिंग सोसायटी मैदानावर सोसायटी क्रिकेट क्लबतर्फे क्रिकेट कोचिंग अकॅडमी सुरु करण्यात आली आहे. त्याचे उदघाट्न पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या सह करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बॅटिंग व बॉलिंग करून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी उद्योजक राजू गुप्ते, किरण मनोरे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, सुनिल मोरे, निलेश पाटील, गणेश कडु, प्रशांत पोतदार, प्रशांत झुंजारराव, उल्हास झुंजारराव, सुमित झुंजारराव, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.