• English
  • मराठी

पाणपोई व हायमास्ट चे उद्घाटन

पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या नगसरसेवक निधीतून नवीन पनवेल मधील सेक्टर १३ मध्ये उभारण्यात आलेल्या पाणपोई व हायमास्ट चे उद्घाटन केले. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील, प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशिला घरत, नगरसेवक मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेविका वृषाली वाघमारे, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, युवा नेते रविंद्र नाईक, जितेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.