• English
  • मराठी

520 कोटींचा कर्नाळा बँक घोटाळा…

हजारो खातेदारांच्या पैशाचा अपहार झाल्याबाबत दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी गुन्हा दाखल होऊनही कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी कोणतीही कारवाई आज पर्यंत करण्यात आलेली नाही. या घोटाळ्यामुळे बरेच खातेदार देशोधडीला लागले आहेत तर कित्येकांची घरे उध्वस्त झालेली आहेत. तरी देखील आघाडी सरकार घोटाळेबाजांना पाठीशी घालतंय. त्यामुळे या आघाडी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत विधानसभेच्या पायऱ्यांवर आमदार महेश बालदी यांच्या समवेत आंदोलन केले. यापुढील काळात देखील खातेदारांचे पैसे परत मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत…
तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार खाते व सीआईडी यांच्या संबंधित अधिकारी यांच्यासह बैठक आयोजित करण्याचे मान्य केल्यामुळे धरणे आंदोलन थांबले.