• English
  • मराठी

आरसीसी टाक्या बांधण्याचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या हस्ते करण्यात आला.

पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रभाग 5 मधील खारघर येथील चाफेवाडी व फणसवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये आरसीसी टाक्या बांधण्याचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या हस्ते करण्यात आला.
सर्वोप्रथम घरो घरी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असून त्यासाठी दोन्ही पाड्यांत प्रत्येकी पाच हजार लिटरची सिमेंट पाण्याची टाकी बसवण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या आदिवासी पाड्यात नागरी सुविधांचे अनेक विकासकामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत .