• English
  • मराठी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती

पनवेल तालुका व शहर भाजपच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, परमेश्वर चिन्मय समेळ, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.