• English
  • मराठी

श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण संपर्क व निधी संकलन अभियान

श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण संपर्क व निधी संकलन अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान संपूर्ण देशभरात होणार आहे. श्री राम मंदिर निर्माण संपर्क व संकलनासाठी पनवेल मधील कार्यालयाचे उद्घाटन मकरसंक्रांतीच्या शुभदिनी डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर, संघाचे प्रांत सहकार्यवाह शरद ओगले, प्रांत सेवाप्रमुख शिरीष देशमुख, पनवेलचे संघचालक प्रशांत कोळी यांच्यासह लोकप्रतिनिधी, समाजातील विविध ज्ञाती प्रमुख, धार्मिक संस्था व मंदिरांचे विश्वस्त तसेच रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.