• English
  • मराठी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील नाव द्यावे .

नवी मुंबईची उभारणी करताना भूमिपुत्रांच्या जमिनी सिडकोने सक्तीने संपादित केल्या. त्यावेळी भूमिपुत्रांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी दि. बा. पाटील यांनी लढा उभारला आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले. आज भूमिपुत्रांना मिळणारा मोबदला दि. बा. पाटील यांच्याच त्यागामुळे मिळाला आहे. नवी मुंबईत उभ्या राहिलेल्या कोणत्याच मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता उभ्या राहत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव मिळावे, अशी भूमिपुत्रांची इच्छा आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव द्यावे .
याबाबत दिलेली मुलाखत..