• English
  • मराठी

पनवेल तालुक्यातील किरवली- रोहिंजन येथे असलेल्या शिळफाटा टोलनाक्यातून स्थानिक ट्रान्स्पोर्टच्या छोट्या मोठ्या वाहनांना स्थानिकांनी मागणी करूनसुद्धा टोलमध्ये सुट न दिल्याने त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या माध्यमातून आज धडक मोर्चा करण्यात आला. या दणक्याने टोलनाका प्रशासनाने ०१ जानेवारी २०२१ पासून टोलमध्ये सुट देण्याचे आश्वासन दिले आहे.

[:en]A strike was called by the Trimurti Drivers' Association today as the small and big vehicles of local transporters were not exempted to pass through the toll plaza at Shilphata toll plaza near Kirvali-Rohinjan in Panvel taluka. The Tolnaka administration has promised to exempt the vehicle of local transporters from the toll w.e.f.January 1, 2021.[:hi]पनवेल तालुक्यातील किरवली- रोहिंजन येथे असलेल्या शिळफाटा टोलनाक्यातून स्थानिक ट्रान्स्पोर्टच्या छोट्या मोठ्या वाहनांना स्थानिकांनी मागणी करूनसुद्धा टोलमध्ये सुट न दिल्याने त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या माध्यमातून आज धडक मोर्चा करण्यात आला. या दणक्याने टोलनाका प्रशासनाने ०१ जानेवारी २०२१ पासून टोलमध्ये सुट देण्याचे आश्वासन दिले आहे.[:] 1

या महामार्गाला सर्व्हिस रोड नसल्याने साहजिकच स्थानिकांना याच मार्गावरून वाहतूक करावे लागते. येत्या काळात या मार्गाचे रुंदीकरण होऊन सर्व्हीस रोड मिळेल पण तो पर्यंत याच मार्गाचा उपयोग केला जाणार त्यामुळे स्थानिकांच्या वाहतूक वाहनांना सूट प्राधान्याने मिळाली पाहिजे. आयआरबी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत टोल सूटचा प्रश्न मार्गी लागला आहे, त्यानुसार स्थानिकांच्या माल वाहतूक वाहनांना सूट मिळणार आहे. मात्र प्रशासनाने माघार घेतल्यास तीव्र आंदोलन करू. या टोल नाक्यावरील कमर्चाऱ्यांना किमान वेतन लागू करावा हि मागणी केली आहे. आरबीआय या बाबतीत सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.