• English
  • मराठी

ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा

देशाचे कार्यतत्पर व लोकप्रिय पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताहानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. ‘आत्मनिर्भर भारत : माझी संकल्पना’ आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोनातून भारतीय सण’ या विषयांवर आपली मते मांडत स्पर्धेत वैदेही सुनील पवार हिने प्रथम पारितोषिक (पाच हजार रुपये), आंचल गुप्ता आणि अर्पिता अरुण पाटील यांनी द्वितीय क्रमांक (तीन हजार रुपये) श्रुती शशिकांत चावरे हिने तृतीय (दोन हजार रुपये), तर उतेजनार्थ (प्रत्येकी पाचशे रुपये) पारितोषिक सिद्धी अनिल बेडेकर, अमित अतुल जोशी, श्रावणी मिलिंद गुजराथी, सृष्टी विक्रांत शिंदे व मोक्षदा दिनेश शेठ यांनी पारितोषिक पटकाविले .