• English
  • मराठी

ई-पुस्तिका प्रकाशन सोहळा

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात देण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने आणि आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड भाजपच्या माध्यमातून जिल्ह्यातील तालुका व शहर मंडलांच्या वतीने लाखो नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, जिल्ह्यात लोकांना अन्नधान्य, मोदी कम्युनिटी किचनच्या माध्यमातून भोजन, मास्क, सॅनिटायझर, औषधे, रक्तदान, पी.एम. केयर फंड, परप्रांतीयांना तसेच कोकणात जायला नागरिकांना सहकार्य, कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी मदत केलेल्या अश्या अनेक सहकार्याची माहिती तालुकास्तरावरील जनतेला ई-पुस्तिकेच्या माध्यमातून व्हावी यासाठी उत्तर रायगड जिल्हा तसेच खोपोली, पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर मंडलच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या सेवाकार्य ई-पुस्तिका प्रकाशन सोहळा पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाला.