• English
  • मराठी

भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत मोलाचे योगदान देणारे थोर व्यक्तिमत्त्व, एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजप खारघर-तळोजा मंडल, एसबीआय आणि शुभम सामाजिक सेवाभावी संस्था (खारघर ओवेपेठ) यांच्या संयुक्त विद्यमाने धामोळे गाव येथे 2500 वृक्षांची लागवड करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते धामोळेवाडीतील मुलांना मास्क व शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रभाग 3, 4, 5, 6 मधील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह एसबीआय बँकेचे अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.