मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर मेट्रो चाचणी संपन्न:
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याकरिता व नागरिकांना शहरांतर्गत प्रवासाचा जलद मार्ग उपलब्ध व्हावा या उद्देशाने मेट्रो प्रकल्पांतर्गत चार मार्ग विकसित करण्यात येत आहेत. त्यांपैकी मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर या मार्गावरील विकासकामे प्रगतीपथावर आहेत. सदर मार्ग क्र. १ मेट्रो चाचणी आज सायंकाळी ५ वाजता आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडली.