उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडले.
सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी भुर्दंड पडू नये आणि कमी खर्चात चांगल्या प्रतीचे उपचार उपलब्ध व्हावे, स्थानिक रुग्णांची उपचारांसाठी होणारी मुंबई पर्यंतची पायपीट वाचावी यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची अनेक वर्षांपासून मागणी होती. सततच्या पाठपुराव्याने अखेर आज पनवेल उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडले. या समारंभात अनेक पदाधिकारी, मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते.