खारघर येथील युवाप्रेरणा सामाजिक संस्था तसेच टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. वाढत्या लोकसंख्येसोबतच अपघात आणि रोगांचीही संख्या वाढली आहे. हीच गरज लक्षात घेऊन खारघर येथील युवाप्रेरणा सामाजिक संस्था तसेच टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिरास पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न अंबाजी काकडे, पनवेल महानगरपालिका स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, नगरसेविका नेत्रा पाटील, किरण पाटील, मामा मांजरेकर, अजय माळी, सनी नवघरे, वासुदेव पाटील, कीर्ती नवघरे, चांदणी अवघडे, आरती नवघरे, सान्या पावसकर, भरत कोंडालकर, दिलीप जाधव, विना गोगरी, संदीप कासार, शुभम म्हात्रे, प्रतीक चव्हाण तसेच इतर कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.