• English
  • मराठी

सी. के. टी. खांदा कॉलनी येथे वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला

वृक्षारोपण तसेच वृक्ष संगोपनाची आजच्या काळात फार गरज आहे. यासाठीच भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा यांच्या वतीने चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या 33 कोटी वृक्षारोपण उपक्रमांतर्गत सी. के. टी. खांदा कॉलनी येथे वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात अनेक कार्यकर्ते, मान्यवर तसेच नागरिक सहभागी होते. अशा उपक्रमात युवा पिढीचे योगदान प्रशंसनीय ठरते.