• English
  • मराठी

शरीराला तंदुरूस्थ ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.

शरीराला तंदुरूस्थ ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. आजकालच्या धावपळीच्या जिवनशैलीत तर योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर, योग हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. त्यामुळेच योगसाधनेची जनजागृती करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यासाठी पतंजली योग समिती पनवेल व रामशेठ ठाकूर विचार मंच यांच्या वतीने नवीन पनवेल येथे सामूहिक योगसाधना केली. या योगसाधनेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.