राज्यात सेना- भाजपा युतीचा निर्णय झाल्यानंतर आज प्रथमच मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना आणि भाजपा ची बैठक पनवेल येथील अशोका लॉन येथे घेण्यात आली.
राज्यात सेना- भाजपा युतीचा निर्णय झाल्यानंतर आज प्रथमच मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना आणि भाजपा पदाधिकारी आणि प्रमुख नेते मंडळीची बैठक पनवेल येथील अशोका लॉन येथे घेण्यात आली. या मनोमीलन बैठकीला ना. सुभाष देसाई, पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, युतीचे उमेदवार खा. श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक मान्यवर, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर विभागातील तिन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.