• English
  • मराठी

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘संघटन संवाद’ या कार्यक्रमाद्वारे देशभरातील भाजप कार्यर्त्यांशी संवाद साधला.

“पुलवामा हत्याकांडाचा बदला घेऊन भारताने आपली शक्ती अवघ्या जगाला दाखवून दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक नवा भारत निर्माण होतोय.” 
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘संघटन संवाद’ या कार्यक्रमाद्वारे देशभरातील भाजप कार्यर्त्यांशी संवाद साधला. त्याअंतर्गत पनवेल मार्केटयार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामध्ये मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘संघटन संवाद’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.