• English
  • मराठी

राज्याचा सन २०१९-२० चा अंतरिम अर्थसंकल्प वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर वित्त व नियोजन राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सादर केला.

राज्याचा सन २०१९-२० चा अंतरिम अर्थसंकल्प वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर वित्त व नियोजन राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सादर केला. सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांसाठीच्या खर्चाचे हे लेखानुदान आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. भयमुक्त, भुकमुक्त, विषमतामुक्त आणि रोजगार युक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला शासनाने प्राधान्य दिल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, या शासनाने तरूणांसाठी चार वर्षांच्या काळात २५ टक्क्यांपेक्षा अधिक रोजगार संधींची निर्मिती केली आहे. शासनाने शेती व पूरक व्यवसायाला प्राथमिकता देतांना सिंचन सुविधांचा विस्तार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नियोजनबद्ध पाऊले टाकली आहेत.