कळंबोली वसाहतीत नवीन जलवाहिन्या टाकणे, मलनिःसारण वाहिन्यांची हायफ्लो सफाई आदी कामे हाती घेण्यात आले आहेत.
कळंबोली वसाहतीत नवीन जलवाहिन्या टाकणे, मलनिःसारण वाहिन्यांची हायफ्लो सफाई आदी कामे हाती घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर येत्या काही महिन्यात सिडकोकडून इतर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहेत. त्यामध्ये रस्ते, उद्यान, पदपथ आणि इतर सुविधांचा समावेश आहे. उर्वरीत आणि प्रलंबीत कामांचा आढावा घेवून ते पूर्ण करून देण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार अधिक्षक अभियंता सिताराम रोकडे आणि कार्यकारी अभियंता गिरीष रघुवंशी यांनी आराखडा तयार करून तो प्रशासकिय मंजुरीकरीता वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. मंजुरीनंतर एजन्सी नियुक्त करून कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.