• English
  • मराठी

नेरूळ येथील श्री शनिश्वर सेवा समितीच्या वतीने शनिमंदिरात महापूजा, भव्य रथोत्सव.

नेरूळ येथील श्री शनिश्वर सेवा समितीच्या वतीने शनिमंदिरात महापूजा, भव्य रथोत्सव आणि धार्मिक सभेचे आयोजन मंदिराचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. व्यासपीठावर आमदार शशिकांत शिंदे, धार्मिक प्रवचनकार भाग्यश्री सातारकर, मुंबई काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार चरणसिंग सप्रा, उद्यान व शहर सुशोभीकरण सभापती मीरा पाटील, पनवेल मनपाचे नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यासह शनिमंदिराचे विश्वस्त, मान्यवर उपस्थित होते.