रसायनीस्थित हिल (एचआयएल) इंडिया लिमिटेड कंपनीत मच्छर नष्ट करण्याचे अद्यावत मच्छरदाणी तयार करण्याचा अर्थात एलएलआयएन प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन ना. गौडा यांच्या हस्ते झाले.
रसायनीस्थित हिल (एचआयएल) इंडिया लिमिटेड कंपनीत मच्छर नष्ट करण्याचे अद्यावत मच्छरदाणी तयार करण्याचा अर्थात एलएलआयएन प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन ना. गौडा यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रसायन व खते स्थायी समिती अध्यक्ष खासदार आनंदराव आडसूळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, युनिडोचे डॉ. रेनेवॅन बेरकेल तसेच अधिकारी, परिसरातील लोकप्रतिनिधी, कामगार आणि नागरिक उपस्थित होते.