आज २ फेबुवारी २०१८ रोजी संजीवनी इंटरनॅशनल स्कुलच्या वार्षिक खेळाच्या स्पर्धा राजीव गांधी स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात साजऱ्या झाल्या. ह्या दोन दिवसाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाच्या विशेष प्रावीण्याचे दर्शन घडवले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शालेय शिक्षणमंत्री व सांस्कृतिक मंञी श्री विनोदजी तावडे उपस्थित होते. तसेच माझ्यासोबत श्रीमती मंदाताई म्हात्रे, श्रीमती स्नेहलताताई कोल्हे आणि श्री नलिनभाई शाह इत्यादी मान्यवरही उपस्थित होते. खेळांमुळे शरीर सुदृढ बनते, तसेच शरीरात स्फूर्ती येते, मन प्रसन्न राहते याची प्रचीती खेळाडूंकडे पाहून होत होती. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पालकांचे सहकार्य आणि शाळेच्या विशेष प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला.
आज २ फेबुवारी २०१८ रोजी संजीवनी इंटरनॅशनल स्कुलच्या वार्षिक खेळाच्या स्पर्धा राजीव गांधी स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात साजऱ्या झाल्या. ह्या दोन दिवसाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाच्या विशेष प्रावीण्याचे दर्शन घडवले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शालेय शिक्षणमंत्री व सांस्कृतिक मंञी श्री विनोदजी तावडे उपस्थित होते. तसेच माझ्यासोबत श्रीमती मंदाताई म्हात्रे, श्रीमती स्नेहलताताई कोल्हे आणि श्री नलिनभाई शाह इत्यादी मान्यवरही उपस्थित होते.
खेळांमुळे शरीर सुदृढ बनते, तसेच शरीरात स्फूर्ती येते, मन प्रसन्न राहते याची प्रचीती खेळाडूंकडे पाहून होत होती. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पालकांचे सहकार्य आणि शाळेच्या विशेष प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला.