सर्वसामान्य माणसाला सहकार्य व्हावे यादृष्टीने कांही नव्या योजना तसेच जुन्या योजनांमध्ये दुरुस्ती केंद्र व राज्य सरकारने केली आहे. या लोकाभिमुख अंमलबजावणी प्रशासनाने करताना तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक आहे अशी सूचना भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तहसीलदारांना केली आहे. आज आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब लाभ योज़नेच्या लाभार्थीना धनादेश वाटप करण्यात आले;त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योज़नेच्या लाभार्थीना संजय गांधी निराधार योजनेचासुद्धा लाभ द्यावा अशीही सूचना त्यांनी यावेळी दिली व त्यानुसार कार्यवाही सुरु झाली आहे. गीता फडके — बोनशेत ,सुरेखा कातकरी — वाजे ,छाया ठाकूर –तक्का ,चांगी कांबडी — कोंबडटेकडी ,दत्तात्रय लबडे — आरवली ,मीराबाई धोंडे — मालधक्का ,अंजली दिसले — चिंचवली ,लीलावती म्हात्रे — केळवणे ,शेवंता कातकरी –चेरवली ,गुलाब कातकरी — शिरढोण ,बाळी वाघ — वारदोली याना आज धनादेश वाटप करण्यात आले . १८ ते ५९ वयोगटातील दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींच्या घरात मागील वर्षामध्ये कमावती व्यक्ती मयत पावली असेल तर त्यांच्या वारसाला २०००० रुपयांची मदत राष्ट्रीय कुटुंब लाभ योज़नेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येते. याबाबत आज मागील महिन्यात तहसील कार्यालयाला आढळलेल्या ११ जणांना या योजनेअंतर्गत धनादेश वाटप करण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे म्हणाले कि, आ. प्रशांत ठाकूर यांच्या स्पष्ट सूचना होत्या कि गावागावात जाऊन नागरिकांचे फॉर्म भरून घ्यावेत व त्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा. त्यानुसार २ महिन्यातून एकदा ग्रामपंचायतींच्या मयत नोंद वहीचा आढावा घेण्यात येतो असे त्यांनी सांगितले. आतापर्यन्त पनवेल तालुक्यात ३११ लाभार्थीना याचा लाभ मिळवून दिल्याची माहितीसुद्धा यावेळी आकडे यांनी दिली. मागील वर्षात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील व्यक्ती मयत झाली असेल तर त्यांच्या नातेवाईकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले.
सर्वसामान्य माणसाला सहकार्य व्हावे यादृष्टीने कांही नव्या योजना तसेच जुन्या योजनांमध्ये दुरुस्ती केंद्र व राज्य सरकारने केली आहे. या लोकाभिमुख अंमलबजावणी प्रशासनाने करताना तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक आहे अशी सूचना भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तहसीलदारांना केली आहे. आज आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब लाभ योज़नेच्या लाभार्थीना धनादेश वाटप करण्यात आले;त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योज़नेच्या लाभार्थीना संजय गांधी निराधार योजनेचासुद्धा लाभ द्यावा अशीही सूचना त्यांनी यावेळी दिली व त्यानुसार कार्यवाही सुरु झाली आहे. गीता फडके — बोनशेत ,सुरेखा कातकरी — वाजे ,छाया ठाकूर –तक्का ,चांगी कांबडी — कोंबडटेकडी ,दत्तात्रय लबडे — आरवली ,मीराबाई धोंडे — मालधक्का ,अंजली दिसले — चिंचवली ,लीलावती म्हात्रे — केळवणे ,शेवंता कातकरी –चेरवली ,गुलाब कातकरी — शिरढोण ,बाळी वाघ — वारदोली याना आज धनादेश वाटप करण्यात आले .
१८ ते ५९ वयोगटातील दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींच्या घरात मागील वर्षामध्ये कमावती व्यक्ती मयत पावली असेल तर त्यांच्या वारसाला २०००० रुपयांची मदत राष्ट्रीय कुटुंब लाभ योज़नेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येते. याबाबत आज मागील महिन्यात तहसील कार्यालयाला आढळलेल्या ११ जणांना या योजनेअंतर्गत धनादेश वाटप करण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे म्हणाले कि, आ. प्रशांत ठाकूर यांच्या स्पष्ट सूचना होत्या कि गावागावात जाऊन नागरिकांचे फॉर्म भरून घ्यावेत व त्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा. त्यानुसार २ महिन्यातून एकदा ग्रामपंचायतींच्या मयत नोंद वहीचा आढावा घेण्यात येतो असे त्यांनी सांगितले. आतापर्यन्त पनवेल तालुक्यात ३११ लाभार्थीना याचा लाभ मिळवून दिल्याची माहितीसुद्धा यावेळी आकडे यांनी दिली. मागील वर्षात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील व्यक्ती मयत झाली असेल तर त्यांच्या नातेवाईकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले.